Type Here to Get Search Results !

राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भोर (Bhor) येथील राजगड ज्ञानपीठाच्या (Rajgad Dnyanpeeth) अनंतराव थोपटे महाविद्यालयातील (Anantrao Thopate Mahavidyalay) अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी (Demands) मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी 2023) महाविद्यालयासमोर आंदोलन केले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या (State level organization of employees) आदेशानुसार महाविद्यालयातील 26 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. (pune news)

आंदोलनात तृतीय श्रेणीतील 7 आणि चतुर्थ श्रेणीतील 19 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे महाविद्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाला. 58 महिन्यांची थकबाकी द्यावी, सहावा वेतन आयोग (6th pay commission) लागू करावा आणि ठराविक वर्षापर्यंत कार्यरत राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती मिळावी, या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख (Principal Dr. Prasanna Kumar Deshmukh) यांच्यासह राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने कार्यकारी अधिकारी तात्याराव जेटीथोर (Executive Officer Tatya Rao Jetithor), श्रीधर निगडे (Shreedhar Nigade) व एस. ए. उल्हाळकर (S. A. Ulhalkar) यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास संस्थेच्या वतीने पाठिंबा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यस्तरीय संघटनेकडून आदेश आल्यानंतरच आंदोलन मागे घेऊन कामकाज सुरू करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी व्यक्त केली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मंगळवारी महाविद्यालयातील विनाअनुदानित कर्मचायांच्याकडून बारावी आणि विद्यापीठाच्या परीक्षांचे कामकाज करून घेण्यात आले असल्याचेही प्राचार्य देशमुख यांनी स्पष्ट केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.