Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 25 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे आणि मुंबईतील वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी विभागाच्या (GST Department) अधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयकडून (CBI) गुरूवारी (दि. 25 फेब्रुवारी 2023) छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईवेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांसह मोठा ऐवजही जप्त (Seized) केला आहे. त्यामुळं आता ऐन पोटनिवडणुकांच्या तोंडावर तपास यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आल्यामुळं पुण्यात खळबळ उडाली आहे. (raid on GST officials houses)
अधिकाऱ्यांच्या बेहिशेबी मालमत्ता (unaccounted assets) प्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुण्यासह मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यासह मुंबईतील जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर गुरूवारी दुपारपासून सीबीआयकडून छापेमारी सुरू करण्यात आली. जीएसटी विभागातील एक प्रकरण बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एक कोटी रुपयांची लाच (bribe) मागितल्याची तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयनं संशयित अधिकाऱ्यांच्या घरावर छापे मारले आहेत. मुंबई आणि पुण्यातील अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चार लाख रुपयांची रोकड, सोनं आणि संशयित कागदपत्रं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी (Financial malfeasance) देशातील प्रमुख महानगरांमध्ये छापेमारी करत अनेक आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता मुंबई आणि पुणे शहरातील जीएसटी अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांकडून आरोपी अधिकाऱ्यांकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. (pune crime news)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84