Type Here to Get Search Results !

गॅलॅक्सी कन्स्ट्रक्शनच्या दोन संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 28 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): करारनाम्याचे उल्लंघन करून आणि मालकी हक्काची मिळकत परस्पर विकून 14 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून गॅलॅक्सी कन्स्ट्रक्शन ॲण्ड कॉन्ट्रक्टर्सच्या (Galaxy Construction and Contractors) दोन संचालकांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी (Chaturshrungi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल (Builder Vijay Jagdishchandra Aggarwal) यांनी चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन ॲण्ड कॉन्ट्रक्टर्सचे संचालक अशोक शिवनारायण थेपडे (Ashok Shivnarayan Thepade) आणि अमित अशोक थेपडे (Amit Ashok Thepade) (दोघेही रा. डी. 22, मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा बनावट कागदपत्रे (forged documents) तयार करणे, करारनाम्याचे उल्लंघन करून फसवणूक करणे आदी कलमांन्वये दाखल केला गेला आहे.

अमित थेपडेला अटक झाली असून त्याला सोमवारपर्यंत (दि. 27 फेब्रुवारी 2023) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते. हा प्रकार ऑगस्ट 2006 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला. त्यातील एका आरोपीला अटकही झाली आहे. दरम्यान, तळमजला आणि दोन मजल्यांच्या बांधकामाला परवानगी असताना, सात मजल्यांचा बनावट बांधकाम नकाशा तयार करून, तो महापालिकेने मंजूर केल्याचे भासवून त्यावरही 24 कोटींचे कर्ज घेतल्याचेही उघड झाले आहे. (pune crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, अगरवाल यांची सिद्धिविनायक दुर्गादेवी डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन (Siddhivinayak Durgadevi Developers Construction) नावाची कंपनी आहे. कंपनीने 2000 मध्ये पाषाण (Pashan) येथील 26 गुंठे जमीन जमीन करारनाम्याने विकसनासाठी घेतली होती. त्यांनी ही जमीन 2006 मध्ये गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन ॲण्ड कॉन्ट्रक्टरच्या संचालकांना भागीदारीत कराराने विकसनासाठी दिली. करारानुसार बांधकाम गहाण ठेवणे किंवा त्यावर बॅंकेतून कर्ज काढण्याची परवानगी दिलेली नव्हती. तसेच, बांधकाम नकाशे मंजूर झाल्यापासून 15 महिन्यांत काम पूर्ण करून देण्याचे ठरले होते.

परंतु, करारनाम्यात ठरल्यानुसार बांधकाम पूर्ण करून दिले नाही. त्यामुळे मुदतवाढ दिली होती. तसेच, कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीस ताबा देण्याचे अधिकार कंपनीला दिले नव्हते. मात्र, गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन कंपनीला दोन मजल्यांची परवानगी असताना, सात मजली इमारतीचा बनावट बांधकाम नकाशा तयार केला. त्याला महापालिकेने (PMC) मंजुरी दिली आहे, असे भासवून पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) एका बॅंकेकडून त्यावर दोन टप्प्यांत 24 कोटींचे कर्ज (Loan) घेतल्याचे उघडकीस आले.

त्यात एका जामीनदाराच्या बनावट स्वाक्षऱ्या (forged signatures) करण्यात आल्या आहेत. तसेच अन्य एका बॅंकेकडूनही सुमारे 6 कोटी 50 लाखांचे कर्ज घेतले आहे. या अगरवाल यांच्या हिश्श्यातील चार कोटी रुपये किमतीचे दुकान आणि साडेदहा कोटी रुपये मूल्य असलेले कार्यालय, थेपडे यांनी परस्पर विकले. त्यामुळे 14 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष तुले (Sub-Inspector of Police Manish Tule) करीत आहे. (pune crime news)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.