Type Here to Get Search Results !

पुरंदर विमानतळ होणार नाही, पुण्याच्या मेट्रो प्रकल्पासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद नाही?

 

पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुरंदर (purandar) येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ (international airport), मेट्रो मार्गांचा विस्तार (pune metro lines expansion), शहरातील विविध विकासप्रकल्प (pune developmental projects) आणि अनेक राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था असतानाही केंद्रीय अर्थसंकल्पात पुण्याच्या हाती भोपळाच आला आहे.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (finance minister nirmala sitharaman) यांनी बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी 2023) अर्थसंकल्प (budget) सादर केला. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अनेक शहरांची नावेही त्यांच्या भाषणात आली; परंतु, संपूर्ण भाषणात एकदाही पुण्याचा उल्लेख आला नाही. पुण्याच्या मेट्रो प्रकल्पासह इतर कोणत्याही प्रकल्पाला आणि संस्थेकरिता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणेकरांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

 

देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी केंद्रातर्फे निधी दिला जातो. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. पुण्यात महामेट्रोतर्फे सध्या वनाज ते रामवाडी (vanaz to ramwadi) आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट (pimpri chinchwad to swargate) या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर आणखी दोन मार्गिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या मार्गिकांसाठी तसेच प्रस्तावित निओ मेट्रोसाठी अर्थसंकल्पात तरतूद असावी, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याचाही उल्लेख अर्थमंत्र्यांच्या भाषणात नव्हता.

 

पुण्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय अनेक वर्ष रखडला आहे. अनेकदा जागाबदल होऊन अखेर पुन्हा एकदा पुरंदर येथील मूळ जागीच हा विमानतळ उभारण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. या प्रकल्पाला गती मिळावी, या अर्थसंकल्पात भरीव तरतूद असेल, अशी पुणेकरांची अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनी 50 नवे विमानतळ, हेलिपोर्ट, एअरोड्रोम उभारण्याची घोषणा केली, त्यावेळी पुणेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले.

 

दर्जेदार शिक्षणसंस्थांसाठी (quality educational institutions) जगभर ओळख असलेल्या पुण्यातील शिक्षण व संशोधन संस्थासाठीही कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नाही. 157 ठिकाणी नर्सिंग कॉलेजेस (nursing colleges) उभारण्यात येणार आहेत. त्यात पुण्याचाही समावेश असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे शहर म्हणून कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटलिजन्स (एआय)(artificial intelligence) साठी प्रस्तावित तीन सेंटर ऑफ एक्सलन्सपैकी (centre for excellence) एक पुण्यात असावे, अशी पुणेकरांना आशा आहे; परंतु, त्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.