Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 28 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बारामतीतील (Baramati) एका युवकाला इंस्टाग्रामवर (instagram) कोयत्यासह फोटो ठेवणे चांगलेच महागात पडले. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल (Superintendent of Police Ankit Goyal) यांनाच मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी बारामती शहर पोलिसांना (baramati police) या बाबत तातडीने कारवाईचे आदेश दिले. यावरून पोलिसांनी आता 'कोयता' या शब्दाला चांगलेच गांभीर्याने घेतलेले दिसत आहे. (pune crime news)
अर्पित मोहिते किंग ऑफ बारामती या इंस्टाग्राम पेजवर (instagram page) कोयत्यासह एका युवकाचा फोटो दिसल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यांनी संबंधितावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे Additional Superintendent of Police Anand Bhoite) व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Ganesh Ingle) यांनी सूचना दिल्या.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील फौजदार युवराज घोडके (Yuvraj Ghodke), पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर (Dashrath Kolekar), कल्याण खांडेकर (Kalyan Khandekar), दशरथ इंगवले (Dasaratha Ingwale), आकाश सीताप (Akash Seetap), शाहू राणे (Shahu Rane) यांनी इंस्टाग्राम वर कोयत्यासह आपला फोटो ठेवणाऱ्या युवकाचा शोध घेतला.(pune crime news)
मिळालेल्या माहितीनुसार, अर्पित सचिन मोहिते (वय 22, रा. बारामती) याने हौस म्हणून चार वर्षांपूर्वी काढलेला कोयत्या सोबतचा फोटो क्रेझ म्हणून स्वतःच्या इन्स्टाग्रामवर ठेवला होता. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 प्रमाणे कारवाई केली आणि घरातील कोयताही जप्त केला. यासोबतच सदरची पोस्टही डिलीट केली.
या पुढील काळात सोशल मिडीयावर पोलीस बारकाईने लक्ष ठेवणार असून कोणाच्याही डीपी किंवा स्टेटस किंवा इतर कोठेही गुन्हेगारी संबंधित मजकूर, हत्यारांबाबतच्या पोस्ट, खुन्नस सारखे शब्दप्रयोग असतील तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84