Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 25 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): “बुद्धिमत्ता, कौशल्य व कलागुण विकसित करा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकण्यासाठी व्यायाम करा. विद्यार्थी दशेतच आपल्या मधील सुप्त गुणांना योग्य वाव द्या. करिअर घडविण्याच्या दृष्टिने जिद्दीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.” असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहतीचे संचालक अमित बेनके (Amit Benke, Director, Maharashtra State Cooperative Industrial Estate) यांनी व्यक्त केले. (pune news)
“आपण निसर्गाचे देणे लागतो. ग्लोबल वार्मिंगमधून बाहेर पडायचे असेल तर निसर्गाचे तसेच पशुपक्षांचेही संवर्धन केले पाहिजे. वृक्षारोपण करून आपल्याला पुढील पिढीला अनेक संकटांपासून वाचविता येईल. विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.” असे माजी सैनिक रमेश खरमाळे (Ex-serviceman Ramesh Kharmale) म्हणाले.
कुरण (Kuran) (ता. जुन्नर) येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बेनके, शिवनेरभूषण विनायक खोत (Shivnerbhushan Vinayak Khot), माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या निमित्त जयहिंद संकुलामध्ये झालेल्या विविध क्रीडास्पर्धा व गुणदर्शन कार्यक्रमात जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Jaihind College of Engineering), जयहिंद पॉलिटेक्निक (Jaihind Polytechnic), जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी (Jaihind College of Pharmacy) व जयहिंद आय. टी. आय. (Jaihind I. T. I.) मधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
प्रा. सुभाष कुडेकर (Prof. Subhash Kudekar) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ (Jitendra Gunjal) होते. शिवनेरभूषण विनायक खोत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विकास दरेकर, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, तंत्रनिकेतनचे प्राचार्य स्वप्नील पोखरकर, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. लीना पाठक, आय. टी. आय. चे प्राचार्य सुभाष आंद्रे सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. हेमंत महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84