Checkmate Times, Pune City, Pune District, Pune
Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal
Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune
Marathi news
पुणे, दि. 28
फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गेल्या काही दिवसांत बॉक्सऑफिसवर (Box Office)
मराठी चित्रपटांचाही (Marathi Movie) बोलबाला दिसून आला.
वेगवेगळ्या जॉनरचे मराठी चित्रपट आपल्या भेटीस आलेले आपण पाहिले. प्रेक्षकांनी या
सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही दिला. आता मराठीतील अनेक उत्कृष्ट
कलाकारांची टीम घेऊन रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव (Sanjay Jadhav) पहिल्यांदाच घेऊन येत आहेत हॉरर कॉमेडी (horror
comedy) जॉनरचा चित्रपट.
मुंबईत आजीवासन स्टुडिओत या
चित्रपटाचा मुहूर्त सोहळा 26 फेब्रुवारी, 2023 रोजी संपन्न
झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Singer, composer, producer and director Avadhoot Gupte) प्रमुख पाहुणे म्हणून या मुहूर्त सोहळ्यास उपस्थित होते. तसंच, चित्रपटातील कलाकारांसोबत इतर टीमनं देखील मुहूर्त सोहळ्यास
उपस्थिती दर्शवली होती. चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्या दिवशीच प्रसिद्ध गायक आदर्श
शिंदे (Singer Adarsh Shinde) यांच्या आवाजात चित्रपटातील पहिलं गाणं देखील रेकॉर्ड करण्यात आलं. (pune news)
आतापर्यंत संजय जाधव यांनी 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'तू ही रे', 'लकी', 'चेकमेट', 'खारी बिस्किट', 'ये रे ये रे पैसा', 'तमाशा लाइव्ह' अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन
केले. पण आता पहिल्यांदाच संजय जाधव 'कलावती' या चित्रपटाच्या माध्यमातून हॉरर कॉमेडी जॉनर घेऊन भेटीस येत आहेत त्यामुळे निश्चितच
उत्सुकता आहे. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), संजय नार्वेकर (Sanjay Narvekar), तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari), अभिजित चव्हाण (Abhijit Chavhan), हरीश दुधाडे (Harish Dudhade), ओंकार भोजने (Omkar Bhojane), दिप्ती धोत्रे (Dipti Dhotre), संजय शेजवळ (Sanjay Shejwal), नील साळेकर (Nil Salekar) अशी कलाकारांची तगडी टीम 'कलावती' या चित्रपटात दिसणार आहे.
के. एफ. फिल्म्स लिमिटेड (K. F. Films Limited), ताहेर सिने टेक्निक्स (Taher Cine Techniques), अमेय खोपकर एंटरटेन्मेंट (Amey Khopkar Entertainment) आणि स्वाती खोपकर (Swati Khopkar) प्रस्तुत 'कलावती' चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी प्रजय कामत (Produced by Prajay Kamat) यांनी उचलली आहे. तर सह-निर्माते म्हणून निनाद नंदकुमार बत्तिन (Co-producer Ninad Nandkumar Battin), तबरेज पटेल (Tabrej Patel), परीन मेहता (Parin Mehta), निश्चय मेहता (Nishchay Mehta), नवीन कोहली (Navin Kohli) काम सांभाळणार आहेत.
चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून वैशाली तुथिका (Executive
Producer Vaishali Tuthika) आणि सावित्री धामी (Savitri
Dhami) काम पाहतील. दिग्दर्शनाची जबाबदारी उचलण्यासोबतच संजय जाधव (Director
Sanjay Jadhav) हे 'कलावती' चित्रपटाचे 'डीओपी' म्हणूनही काम पाहणार आहेत.
चित्रपटाचे संगीतकार पंकज पडघन (Composer Pankaj Padghan) हे असणार आहेत.
मराठीतील प्रसिद्ध लेखक अभिजित गुरुनं (Author Abhijit Guru)
चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, तर चित्रपटाची कथा निशांत भुसे (Nishant Bhuse) आणि अनुजा कर्णिक (Anuja Karnik) यांची आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84