Type Here to Get Search Results !

कोथरूड मध्ये अज्ञात टोळक्याने केला एकाचा निघृण खून; नुकताच आला होता तुरुंगातून

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कोथरूडच्या हॅपी कॉलनी (happy colony kothrud) चौकात मोक्काच्या (MCOCA) गुन्ह्यातून जामिनावर आलेल्या गुन्हेगाराचा दोन दुचाकींवरून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने निघृणपणे खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, अलंकार पोलीस स्टेशन (Alankar Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune crime news)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदू अनंता जाधव (Nandu Ananta Jadhav) (वय 22, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवार दि. 23 फेब्रुवारी 2023 रात्री दहाच्या सुमारास कोथरूडच्या हॅपी कॉलनी चौकातून गोसावी वस्तीच्या (Gosavi Vasti) दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून जात असलेल्या नंदूला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अडवून, त्याला दमदाटी करत, त्याच्यावर लोखंडी हत्यारांनी जिवघेणा हल्ला केला.

यामध्ये हल्ला अडवत असताना त्याच्या दोन्ही हातांवर गंभीर घाव झाले, तर हल्लेखोरांनी नंदूला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात नंदू गंभीर जखमी झाला. यावेळी काही जणांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. नंदू जाधव हा गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात तो नुकताच जामीनावर बाहेर आला होता. हा सगळा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पोलिसांच्या हाती लागले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...! 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.