Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राच्या फौजिया खान, अमोल कोल्हे, हिना गावित आणि गोपाळ शेट्टी यांचा होणार संसदरत्न सन्मान

 



Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): संसदरत्न पुरस्कार 2023 ची (Sansadratna Award 2023) घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achivement Award 2023) विजेत्यांचा समावेश आहे. जीवनगौरव पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी.के. रंगराजन (T K Rangrajan) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, महाराष्ट्रातील भाजपचे लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी (MP Gopal Shetty), राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe), भाजपच्या हिना गावित (Heena gavit), राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान (Faujiya Khan) यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खासदार हीना गावित यांना यंदाही संसदरत्न जाहीर झालेला असून, त्यांचा हा सलग सातवा संसदरत्न पुरस्कार आहे. शनिवार दि.२५ मार्च २०२३ रोजी या पुरस्कारांचे वितरण नवी दिल्ली (New Delhi) मध्ये होणार आहे.

'संसदरत्न पुरस्कार 2023'ची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. जीवनगौरव पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी. के. रंगराजन (Former Member of Parliament of the Marxist Communist Party T K Rangrajan) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, महाराष्ट्रातील भाजपचे लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी (BJP Lok Sabha MP Gopal Shetty), राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (Late President of India Bharat Ratna Dr. A.P.J. Abdul Kalam) यांनी संसदरत्न पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. तर डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने यावर्षीपासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील लोकसभेच्या अर्थविषयक संसदीय समिती आणि विजय साई रेड्डी (Vijay Sai Reddy) यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभेच्या पर्यटन, वाहतूक आणि संस्कृतीविषयक स्थायी समितीलाही संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Union Minister Arjun Ram Meghwal) यांच्या अध्यक्षतेखालील आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस कृष्णमूर्ती (Former Chief Election Commissioner S Krishnamurthy) यांच्या सह-अध्यक्ष असलेल्या संसदेचे सदस्य आणि इतरांचा समावेश असलेल्या निवड समितीकडून संसदरत्न विजेत्यांची निवड केली आहे.

लोकसभेच्या (Lok Sabha) या सदस्यांना घोषित झाला आहे संसदरत्न पुरस्कार

1) विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड) (Vidyut Baran Mahato),

2) डॉ. सुकांता मजुमदार (भाजप, पश्चिम बंगाल) (Dr. Sukanta Majumdar),

3) कुलदीप राय शर्मा (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, अंदमान निकोबार बेटे) (Kuldeep Ray Sharma),

4) डॉ. हिना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र) (Dr. Heena Viajykumar Gavit),

5) अधीर रंजन चौधरी (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, पश्चिम बंगाल) (Adhir Ranjan Choudhary),

6) गोपाल चिनया शेट्टी (भाजप, महाराष्ट्र) (Gopal Chinaya Shetty),

7) सुधीर गुप्ता (भाजप, मध्य प्रदेश) (Sudhir Gupta),

8) डॉ. अमोल रामसिंग कोल्हे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, महाराष्ट्र) (Dr. Amol Ramsingh Kolhe)

यांना 17 व्या लोकसभेतील विविध श्रेणींमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल 'संसद रत्न पुरस्कार 2023' साठी नामांकित करण्यात आले आहे.

हे नामांकन प्रश्न, खाजगी सदस्य विधेयके आणि 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून हिवाळी अधिवेशन 2022 च्या अखेरीपर्यंत सदस्यांनी सुरू केलेल्या चर्चेतील एकत्रित कामगिरीवर आधारित आहेत. सदस्यांच्या कामगिरीचा डेटा पीआरएस इंडिया, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने प्रदान केलेल्या डेटावरून प्राप्त केला आहे.

राज्यसभेच्या या सदस्यांना घोषित झाला आहे संसदरत्न पुरस्कार

1) डॉ. जॉन ब्रिटास (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-एम, केरळ) (Dr. Joan Britas),

2) डॉ. मनोज कुमार झा (राष्ट्रीय जनता दल, बिहार) (Dr. Manoj Kumar Jha),

3) फौजिया तहसीन अहमद खान (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, महाराष्ट्र) (Foujiya Tahasin Ahmad Khan)

यांना 2022 मध्ये राज्यसभेतील त्यांच्या कामगिरीसाठी ‘बसलेले सदस्य’ श्रेणी अंतर्गत नामांकन देण्यात आले आहे. विशंभर प्रसाद निषाद (Vishambhar Prasad Nishad) (समाजवादी पार्टी, उत्तर प्रदेश) आणि छाया वर्मा (Chhaya Varma) (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, छत्तीसगड) यांना राज्यसभेतील त्यांच्या पूर्ण कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘2022 मध्ये निवृत्त राज्यसभा सदस्य’ श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.