Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमधून मंत्रालय ते ठाणे प्रवास

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांचा (Kasba and Chinchwad By-elections) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण (Politics) चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांवरुन महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) मतभेद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार (Pimpri NCP MLA) अण्णा बनसोडे (Anna Bansode) चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) कारमधून प्रवास करताना दिसला आहे. त्यांनी कारमधून मंत्रालय ते ठाणे असा प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला महाविकास आघाडीच्या काळात अटक केली होती. या अटकेमुळं अण्णा बनसोडे राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा आहे. मध्यंतरीच्या काळात अण्णा बनसोडे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती.

त्याचबरोबर बनसोडे हे अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमांना देखील गैरहजर होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमधून बनसोडेंचा प्रवास अनेक गोष्टींबद्दलची शंका उपस्थित करत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.