Type Here to Get Search Results !

वेगवान 'वंदे भारत’ला दौंड मध्ये ब्रेक लावा; भाजप आमदार राहुल कुल यांची मागणी

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus - CST) मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला (Mumbai-solapur vande bharat express) दौंड जंक्शन रेल्वे स्थानकावर (Daund Junction) थांबा करण्याची मागणी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावासाहेब दानवे पाटील (Ravasaheb Danve Patil, Minister of State for Central Railway) यांच्याकडे त्यांनी ही मागणी (Demand) केली आहे.

मुंबई - चेन्नई लोहमार्गावरील दौंड एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून माल वाहतुकीचा महत्त्वाचा मालधक्का आहे. वंदे भारत एक्स्प्रेस मुळे वेळेची बचत होणार असल्याने दौंड रेल्वे स्थानकावरून मुंबई व सोलापूर कडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. दौंड बरोबर शेजारील बारामती, इंदापूर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील प्रवाशांना देखील या एक्स्प्रेसचा लाभ होणार आहे.

मुंबई जाण्यासाठी नियमितपणे रेल्वे प्रवास करणारे व्यापारी, शासकीय अधिकारी, व्यावसायिक, विद्यार्थी, आदी वर्गांना देखील या एक्स्प्रेसचा लाभ होणार असल्याने थांबा देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.