Type Here to Get Search Results !

वर्षभर सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या वैज्ञानिक संशोधन संस्था आजच्या दिवशी सर्वांसाठी आहेत खुल्या

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 28 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वर्षभर सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या वैज्ञानिक संशोधन संस्था राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त (National Science Day) सर्वांसाठी खुल्या केल्या जातात. त्यामुळे आज मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी 2023) शहरातील विविध संस्थांमध्ये प्रदर्शने (exhibitions), व्याख्याने आणि माहितीपटांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध संस्थांमधील कार्यक्रमे आणि प्रदर्शनांचा आढावा पुढीलप्रमाणे-

1) एनसीसीएस - NCCS

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune Vidyapeeth) स्थित राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (National Centre For Cell Science) (एनसीसीएस-NCCS) विज्ञान दिनानिमित्त सर्वांसाठी खुली असणार आहे. यावेळी विविध पेशी, जीवाणू यांची मॉडेल्स आणि प्रदर्शन विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. तसेच संस्थेत कार्यरत शास्रज्ञांशीही (Scientists) भेट घेता येईल.

वेळ - सकाळी 10 ते संध्याकाळी 5

2) भौतिकशास्र विभाग (Physics Department), सा. फु.पुणे विद्यापीठ (SPPU)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्र विभागात मंगळवारी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. वैज्ञानिक खेळ, व्याख्याने, प्रयोगशाळांची भेट यासह नासाचे निवृत्त वैज्ञानिक डॉ. रवी मार्गसाहायम (Retired NASA Scientist Dr. Ravi Margasahayam) यांचे प्रमुख व्याख्यान होईल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. संदेश जाडकर (Physics Department Head Dr. Sandesh Jadkar) यांनी दिली.

कालावधी - सकाळी 9 ते संध्याकाळी 5

3) आयसर पुणे (Indian Institute of Science Education and Research, Pune - IISER)

पाषण (Pashan) रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) मंगळवारी दिवसभर प्रदर्शने, वैज्ञानिकांची व्याख्याने आणि भेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. इंदिरा बालन सायन्स ॲक्टीवीटी सेंटर (Indira Balan Science Activity Centre) येथे कार्यक्रम पार पडतील.

वेळ - सकाळी 10 ते संध्याकाळी 5

4) एनसीआरए (NCRA) - जीएमआरटी (GMRT), खोडद

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रांची खोडद (National Center for Radio Astrophysics, Khodad) स्थित रेडिओ दुर्बिण जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) येथे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच एनसीआरएच्या वतीने एका ऑनलाईन प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातील 360 शाळांतील 850 प्रकल्पांनी सहभाग नोंदविला आहे. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने यात सहभागी होता येईल. तसेच खोडद येथील दूर्बिणीला प्रत्यक्ष भेट देता येईल.

प्रदर्शन कालावधी - 28 फेब्रुवारी ते 1 मार्च (सकाळी 9 ते संध्याकाळी 5)

सूचना - पुणे ते नारायणगाव (Narayangaon) आणि पुढे खोडदसाठी एस. टी. उपलब्ध

5) मुक्तांगण विज्ञानशोधिका (Muktangan Exploratory Science Centre)

सेनापची बापट रस्ता (Senapati Bapat Road) येथील मुक्तांगण विज्ञान शोधिकेत ‘सायन्स कार्निव्हल’ (Science Carnival) आयोजित करण्यात येणार आहे. मनोरंजन प्रात्यक्षिके, विज्ञान खेळणी आदींचा समावेश आहे.

वेळ - दुपारी 4 ते 7

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.