Type Here to Get Search Results !

टक्केवारी वर अनधिकृतपणे सुरू असलेल्या पॅथॉलॉजी लॅबच्या मनमानी कारभाराला बसणार चाप

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पॅथॉलॉजी लॅब (pathology lab) चालवण्यासाठी संबंधित पॅथॉलॉजिस्ट (pathologist) आणि कर्मचाऱ्यांकडे आवश्यक पात्रता (qualification) आहे का, याची तपासणी महापालिकेतर्फे (pune municipal corporation) केली जाणार आहे. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू असलेल्या पॅथॉलॉजी लॅबच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.

पुण्यात सद्यस्थितीत 580 पॅथॉलॉजी लॅब आहेत. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी पदवी, पदविका नसताना आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसताना अनेक जण राज्यात पॅथॉलॉजी लॅब थाटून आहेत; तसेच कॉर्पोरेट पॅथ लॅब रक्ताचे नमुने (blood samples) संकलन करणारे तंत्रज्ञ म्हणून घरोघरी जाऊन नमुने घेतात. त्याचबरोबर अवास्वत शुल्क आकारणी करून कायद्याचे उल्लंघन करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. काही एम. डी. पॅथॉलॉजी डॉक्टर अप्रशिक्षित व वैद्यक परिषदेची नोंदणी नसलेल्या व्यक्तींना कमिशन देऊन लॅब चालवत असल्यामुळे कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुणे विभागीय आरोग्य सेवा उपसंचालकांनी याबाबत महापालिका आरोग्य विभागाला पत्र दिले आहे. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व पॅथॉलॉजी लॅबची तपासणी (inspection) करावी आणि लॅब कार्यरत नसल्यास कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. महापालिका आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालये आणि पॅथॉलॉजी लॅबना पत्र पाठवून पॅथॉलॉजिस्टना माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सर्व तपशील आरोग्य विभागाला (health department) सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. माहिती सादर न करणाऱ्या आणि अनधिकृतपणे (unauthorised) सुरू असलेल्या पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यात येणार आहे.

पुढील माहिती (details) पॅथॉलॉजी लॅबना सादर करावी लागणार आहे -

- पॅथॉलॉजी लॅबचे नाव

- कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पत्रता

- नोंदणी दिनांक

- नोंदणीची मुदत

- पॅथॉलॉजिस्टचा हुद्दा

- महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे केलेली नोंदणी

“शहरातील सर्व नोंदणीकृत पॅथॉलॉजी लॅबना पत्र पाठवले आहे. मुख्य पॅथॉलॉजिस्टसह त्यांच्या कर्मचाऱ्यांचे तपशील आठ दिवसांत सादर करण्यास सांगतिले असून, तपशील आल्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.” असे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.