Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर (pune city) आणि पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad PMP depot) पीएमपीच्या डेपोपासून पाच किलोमीटरच्या अंतरासाठी 5 रुपये तिकिट आकारणी बंद करण्यात आली असून, त्या मार्गांवर नेहमीप्रमाणे तिकिट आकारणी होणार आहे. त्यामुळे टप्प्यानुसार प्रवाशांकडून पाच ते दहा रुपये तिकिट आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (PMPML bus rates per 5 kilometers to be increased)
हा बदल 28 मार्गांवर होणार आहे. पीएमपीने 25 ऑक्टोबर 2020 पासून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकिट आकारणी सुरू केली होती. त्यासाठी 56 मार्ग निश्चित करण्यात आले होते. परंतु, काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे ते बंद करून 28 मार्गांवर ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती.
परंतु, बस वाहतुकीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता 5 किलोमीटर अंतरासाठी 5 रुपये तिकिट आकारणीमुळे पीएमपीने आर्थिक नुकसान (Financial loss) होत होते. त्यातून संचलनातील तुटही वाढत होती. त्यामुळे या 28 मार्गांवर 19 फेब्रुवारी 2023 पासून नेहमीच्या दराने तिकिट आकारणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने (PMP Administration) घेतला आहे.
या मार्गांवर होणार नेहमीच्या दराने तिकिट आकारणी (डेपो आणि त्यातंर्गत मार्ग)
- स्वारगेट - पुणे स्टेशन- ताडीवाला रस्ता, पुलगेट ते शीतल पेट्रोल पंप
- नरवीर तानाजी वाडी - डेक्कन - गोखलेनगर, डेक्कन- नीलज्योती
- कोथरूड - कोथरूड स्टॅंड ते कोथरूड स्टॅंड (वर्तुळाकृती मार्ग), गालिंदे पथ ते दांगट वस्ती, कर्वेनगर (गार्डन सिटी) ते कर्वेनगर (वर्तुळ)
- कात्रज - जांभुळवाडी, नह्रेगाव, गुजरवाडी, येवलेवाडी, वाघजाईनगर
- हडपसर - सासवड रोड रेल्वे स्टेशन, महंमदवाडी, फुरसुंगी, मांजरी, संकेतविहार, मांजरी बुद्रुक
- अप्पर डेपो - मार्केटयार्ड- शत्रुंजय मंदिर (वर्तुळ), कात्रज- कोंढवा रोड- अप्पर डेपो
- निगडी - निगडी- रूपीनगर, खंडोबामाळ ते चिखली
- भोसरी - भोसरी- दिघी, चऱ्होलीगाव- आळंदी
- पिंपरी - चिंचवडगाव - वाल्हेकरवाडी
- बालेवाडी - चिंचवडगाव - आकुर्डी रेल्वे स्टेशन
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84