Type Here to Get Search Results !

खाल्ले फटके; लहान मुलांवर हल्ला करणारी कुत्री पकडणाऱ्यांचे प्राणी प्रेमी करत होते लाईव्ह


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भटक्या श्वानांना (street dogs) पकडण्यासाठी 40 ते 50 जणांच्या हातातील काठ्या पाहून घाबरलेल्या तरुणाने इन्स्टाग्राम लाइव्ह (Instagram Live) सुरू केले. ते पाहून जमावाने त्याला मारहाण करीत मोबाईल हिसकावून घेतला. त्याशिवाय सोबतच्या तरुणीला बेदम मारहाण करीत मोटारीचे नुकसान केले. (pune crime news)

याबाबत नीतिशा सक्सेना (Nitisha Saxena) (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्निल होळकर (Swapnil Holkar) (वय 44), नितीन निगम (Nitin Nigam) (वय 40) यांच्यासह 10 महिलांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 फेब्रुवारीला वडगाव शेरीतील (vadgaon sheri) ब्रह्मा सनसिटी सोसायटी (Brahma Suncity Society) आवारात घडली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाने चिमुरड्यावर हल्ला करीत लचके तोडले होते. त्यामुळेच जमावाकडून श्वानांची धरपकड केली जात होती. त्याला काही प्राणिप्रेमींनी (animal lovers) आक्षेपही घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीतिशा आणि त्यांचा मित्र कपिल मोटारीतून 11 फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास वडगाव शेरीतील ब्रह्मा सनसिटी सोसायटीत मैत्रिणीला भेटायला गेले होते. त्या वेळी 40 ते 50 जण भटक्या श्वानांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या हातामध्ये काठ्या असल्यामुळे कपिल घाबरून गेला.

त्याने मोबाईलमध्ये इन्स्टाग्रामद्वारे लाइव्ह करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जमावाने कपिलला हाताने मारहाण करीत मोबाईल काढून घेतला. त्याशिवाय नीतिशा यांना 10 महिलांनी बेदम मारहाण केली. मोटारीचे नुकसान केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर (Police Inspector Ravindra Alekar) तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.