सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 30 दिवसांच्या आत 50 हजार रुपयांचे सहाय्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने (central government) घेतला होता. हा निधी राज्य सरकारकडून सबंधित कुटुंबियांना वितरीत केला जातो.
दुर्देवाने
कोरोनाच्या दोन्ही लाटेत या महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
त्यांच्या कुटुंबियांना आधार म्हणून अनेकांनी ऑनलाईन फॉर्म (online form) भरल्यानंतर त्यांना सहाय्य देण्यात आले
आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या उदासीन कारभारामुळे अजूनही काही लोकांचे
नातेवाईक या मदतीपासून वंचित आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात (pune city) एकूण 1053 जणांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.
याची एकूण रक्कम 5,26,50,000 रुपये इतकी आहे.
या लोकांचे नातेवाईक सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. मात्र शासनाकडून मदत मिळाली नसल्याने त्यांना मदत देण्यास जिल्हा प्रशासन असमर्थता व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून या प्रलंबित निधी बद्दल शासनाकडे तीन याद्या पाठवण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत 807 दुसऱ्या यादीत 182 तर तिसऱ्या यादीत 64 अर्जदारांचा समावेश आहे. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हा निधी मृतांच्या नातेवाईकांना मिळवून द्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84