Type Here to Get Search Results !

पोटनिवडणुकीत कोणीही आचारसंहिता उल्लंघन करत असल्यास इथे करा तक्रार

 

पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या सी-व्हिजिल’ (C-VIGIL App) ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चिंचवड (Chinchwad) व कसबा पेठ (Kasba peth) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक जाहीर झाली असून 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान (voting) होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता याव्यात यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. प्ले स्टोअरवर (play store) जाऊन सी-व्हिजिलहे ॲप नागरीकांना मोफत डाऊनलोड करता येणार आहे.

पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या 52 तक्रारींचे आता पर्यंत निरसन करण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये छायाचित्र (photo), व्हिडीओ (video)किंवा ऑडिओ (audio) तयार करुन पोस्ट करून आचारसंहिता भंग तक्रारीची नोंद करता येते. तक्रार नोंदवल्यानंतर ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जाणार आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तक्रारीमध्ये तथ्य असल्यास तातडीने संबंधिततांवर कारवाई करणार आहेत. यामुळे तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो. तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश (message) पाठविला जाणार आहे.

याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे (Deputy Collector and Coordinating Officer Sachin Ethape) यांनी दिली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.