Type Here to Get Search Results !

रस्त्याने चालत चाललेल्या अंध विद्यार्थ्यांना पीएमपीची धडक; दोघे गंभीर जखमी

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या (Garware College) प्रवेशद्वाराजवळ दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना (Two disabled students accident) ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (PMPML) बसने मंगळवारी धडक दिली. या अपघातात ते दोघे गंभीर जखमी जखमी झाले. (Pune accident)

स्वामी यल्लप्पा धनगर (वय 52, रा. वैदूवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पीएमपी चालकावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव विष्णू क्षीरसागर (वय 21) आणि मयुरी मुरलीधर गरुड (वय 24, दोघे रा. शासकीय वसतिगृह, मोशी) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. बसचालक शिवदास काळे (वय 35, रा. कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आणि मयुरी गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ते दोघे महाविद्यालयाच्या बाहेरच्या बस थांब्यापासून सकाळी 11 वाजता चालत जात असताना पुणे स्टेशन ते एनडीए गेट या बसने त्यांना समोरून धडक दिली. अपघातात दोघांच्या डोक्‍याला जबर मार बसला असून, दुखापत गंभीर असल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले.

‘हेल्प रायडर’ (Help Rider) चळवळीचे कार्यकर्ते संतोष पोळ (santosh pol) यांनी,“हा अपघात झाला तेव्हा मी तेथून जात होतो. रिक्षाचालकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना समोरील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या प्रक्रियेत वेळ गेला. लोक मदत करण्याऐवजी फोटो काढत होते,” अशी प्रतिक्रिया दिली.

“काहीही चूक नसताना त्याच्यावर ओढवलेल्या या प्रसंगाने आम्हाला धक्का बसला आहे. मयुरीला आई-वडील आणि दोन भाऊ आहेत. गेवराईनंतर आळंदी येथे तिने शिक्षण घेतले आहे,” असे वैभवच्या मित्रांनी सांगितले. वैभव आणि मयुरी मराठवाड्यातील आहेत. वैभवची आई आणि दोन भावंडे गावाकडे असतात.

विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे. विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.