Type Here to Get Search Results !

दौंड जवळ ट्रक आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, ४ ठार, २० जखमी

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (pune-solapur highway) चौफुला नजीक वाखारी (wakhari) हद्दीत बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात (accident) झालाय. या अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर 20 हून अधिक प्रवाशी गंभीर जखमी झालेत. (pune accident)

मिळालेल्या माहितीनुसार, लक्झरी बस (Luxury Bus) सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. चौफुला ओलांडल्यानंतर वाखारी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावरच थांबला होता. यादरम्यान सोलापूरवरुन पुण्याला निघालेल्या लक्झरी बस चालकाला ट्रकचा अंदाज न आल्याने बस ट्रकला धडकली.

महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या एक बाजूचा चक्का चूर झालाय. अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त केला जात आहे.

जखमींना यवत (Yavat) आणि केडगावमधील (Kedgaon) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींना पुण्याच्या रुग्णालयात देखील नेण्यात आल्याची माहिती मिळती आहे.

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले आणि अपघातासंदर्भात पुढील चौकशी करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.