Type Here to Get Search Results !

गूगल मॅपने दाखवला चुकीचा रस्ता; वळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  सिंहगडावर पर्यटनासाठी आलेल्या जोडप्याने दुचकीवरून परतताना गूगल मॅपद्वारे (google map) मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी थेट महामार्गावर (Highway) आल्याने मार्ग चुकला. यामुळे महामार्गावर वळण घेत असतानाच ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला तर तरुणाला दुखापत झाली.

याप्रकरणी महिलेचा मित्र नटराज अनिलकुमार (30, रा. वानवडी) याने तक्रार दिली असून ट्रक चालकावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा इम्तीयाज मुकादम (23, रा. खराडी) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नटराज आणि रिदा हे दोघेही एकाच कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. ते दोघे रविवारी (दि. 29 जानेवारी 2023) सिंहगडावर (sinhagad) फिरायला गेले होते. तेथून त्यांना पुन्हा वानडीला (wanadi) जायचे होते.

यासाठी त्यांनी गूगल मॅप लावला होता. गूगल मॅपने दाखवलेल्या मार्गानुसार ते थेट नवीन कात्रज बोगद्याकडे आले. बोगद्यापाशी आल्यावर त्यांना मार्ग चुकल्याचे लक्षात आले. यामुळे नटराज बोगद्याच्या अलीकडून वळून माघारी फिरत असताना त्यांना एका ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये रिदा ट्रकखाली सापडून तीचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करत आहेत.

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार

जोत्स्ना सूर्यकांत वाघुले (40, रा. दिघी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सूर्यकांत वाघुले (46) जखमी झाले असून त्यांनीच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पसार झालेल्या ट्रकचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सूर्यकांत आणि त्यांची पत्नी ज्योत्स्ना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन (Mumbai-banglore road) निघाले होते. वडगाव उड्डाणपुलाजवळ (Vadgaon Flyover) भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्योत्स्ना यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.