Type Here to Get Search Results !

पुण्यात इमारतीच्या फुटिंगसाठी सुरुंगाचे स्फोट; ढिगाऱ्याखाली गाडले गेले मजूर

 


पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): इमारतीचा पाया खोदण्यासाठी लावलेल्या सुरुंगाच्या स्फोटातील उडालेले दगड अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू, तर दुसऱ्या कामगाराचा हात मोडल्याची धक्कादायक घटना उघड झाली. ही घटना खराडी (Kharadi) परिसरात घडली असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके (Police Sub-Inspector Goraksh Ghodke) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात  (chandannagar police station) फिर्याद दिली आहे. (pune accident)

या घटनेत काही महिला व पुरुष कामगारही गंभीर जखमी झाले. कादीर शेख (kadir shaikh)(वय 23, रा. खराडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. तर नोरेश चौधरी (noresh Chaudhary) याचा हात मोडून तो गंभीर जखमी झाला आहे. तर, सचिन आटपाडकर (Sachin aatpadkar) (वय 38, मूळ रा.घोटावडे, मुळशी), गौतम मंडल (gautam mandal)(वय 36), दिप मार्सकोले (वय 23, रा. घोटावडे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 2 जानेवारी 2023) सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथे प्लॅनेज कन्स्ट्रक्‍शन प्रा. लि. (Planage Construction Pvt. Ltd.) या बांधकाम कंपनीकडून गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. तेथे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास काही कामगारांनी स्फोटक पदार्थांचा वापर करून सुरुंग उडविले. (The tunnel was blown up using explosives) त्यावेळी संबंधित कामगारांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेतली नाही. त्यामुळे सुरुंगाच्या स्फोटानंतर मोठमोठे दगड उडून बाहेर पडले.

 

त्याच ठिकाणी कादीर शेख, नोरेश चौधरी व अन्य महिला, पुरुष कामगार पीसीसीचे काम करीत होते. सुरुंगाच्या स्फोटातून उडालेले दगड त्यांच्या अंगावर पडले. कादीर शेख, नोरेश चौधरी यांच्या अंगावर यातील मोठे दगड पडले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपुर्वीच कादीरचा मृत्यू झाला. तर नोरेशचा हात मोडला.

दरम्यान, सुरुंग उडविणाऱ्या कामगारांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.