Type Here to Get Search Results !

आता पुणे विमानतळही बनणार सुविधांमध्ये हायटेक !

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 25 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी आता सेन्सरचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी पुणे विमानतळावर (pune airport) पहिल्यादांच ‘पीएफएमएस’चा (पॅसेंजर फ्लो मॅनेजमेंट सिस्टिम) (PFMS) वापर होईल. यासह बॅगेजच्या कटकटीपासून सुटका होण्यासाठी देखील इन लाइव्ह बॅग्ज प्रणालीचा वापर होणार आहे. यासह अन्य सुविधा प्रवाशांना येत्या काही महिन्यांत पुणे विमानतळावर उपलब्ध होणार आहेत. (pune news)

प्रवासी सुविधांच्या बाबतीत पुणे विमानतळ हायटेक (high-tech) होत आहे. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे. पुणे विमानतळाच्या 60 हजार चौरस फुटांच्या क्षेत्रांवर उभे राहत असलेल्या नव्या टर्मिनल इमारतीचे (New Terminal Building) काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

देशात काही खासगी विमानतळांवर जी सुविधा पुरवली जात आहे, तीच सुविधा पहिल्यादांच पुणे विमानतळांवर उपलब्ध केली जात आहे. जुनपासून नव्या टर्मिनलच्या इमारतीमधुन विमानसेवा सुरु केली जाईल. त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. नव्या इमारतीमुळे प्रवाशांची संख्या व विमानाची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

पुणे विमानतळाच्या सध्या प्रचलित असलेल्या टर्मिनलला नव्या टर्मिनलला जोडण्यासाठी तीन स्तरांवर पूल (ब्रिज) बांधले जाणार आहे. त्याच्या कामाला सुरवात देखील झाली आहे. तळमजला, पहिल्या मजल्यावर एअर साइड कॉरिडॉर (Air Side Corridor) व सेक्युरिटी होल्ड (Security Hold) असे दोन स्तरांवर ब्रिज बांधले जाणार आहे. अशा प्रकारे तीन पुलाच्या माध्यमातून दोन्ही टर्मिनलला जोडले जात असल्याने प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे होणार आहे. याच्या कामाला सुरवात झाली असून मे महिन्याच्या अखेर काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सुमारे 11 मीटर या पुलाची लांबी असेल.

नवे टर्मिनल पुढीलप्रमाणे आहे -

क्षेत्रफळ : सुमारे 60 हजार चौरस फूट

प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी 20 लाख

एरोब्रिज : 5

एकूण खर्च : 525 कोटी

प्रवाशांना नव्या सुविधा या केवळ नव्या टर्मिनल इमारतीमध्ये (newly added facilities at new terminal) दिल्या जातील. त्या सुविधा पुढीलप्रमाणे -

1. चेक इन काउंटरजवळ (Check In Counter) प्रवाशांची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त झाली तर तिथे बसविलेल्या सेन्सरमुळे याची तत्काळ माहिती वरिष्ठापर्यंत पोचेल. त्यामुळे प्रवाशांनी तक्रार करण्याची अथवा कोणी रिपोर्ट करण्याची गरज नाही. तत्काळ त्यावर अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

2. प्रवाशांच्या बॅगेज चेक करण्यात आता बराच वेळ जातो. त्यासाठी दुसरी रांग करून त्यात थांबावे लागते. नव्या इन लाइव्ह बॅग्ज प्रणालीमुळे प्रवाशांना केवळ बॅगसाठी वेगळी रांग लावावी लागणार नाही. या प्रणालीमुळे एक्स रे मशिनमधून बॅगेज बेल्टवर नेण्यासाठी प्रवाशांना जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.

3. फूड कोर्ट (Food Court)

4. प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज यात एक कर्मशियल लाउंजचा देखील समावेश असणार आहे.

5. कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर.

6. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.

7. रेस्टॉरंट (Restaurent)

याबाबत पुणे विमानतळाचे (नवे टर्मिनल) सरव्यवस्थापक गगन मलिक (Gagan Malik, General Manager, Pune Airport (New Terminal)) म्हणाले कि,”नव्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या एरोब्रिज जोडण्याचे काम सुरु आहे. मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन जून पासून नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येईल.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.