Type Here to Get Search Results !

ऐन पोटनिवडणुकीत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा पक्षाला राम राम

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर चिंचवड पोट निवडणुकीची (hinchwad by-election) रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचार जोरात सुरू असताना चिंचवड मतदारसंघात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे (Former BJP corporator Tushar Kamthe) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. (Pune Politics Former BJP corporator Tushar Kamthe resigns from BJP)

गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते भाजपमध्ये काम करत होते. मात्र, त्यांच्या कामाची कोणतीही दखल घेतली जात नव्हती आणि त्यातून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा प्रचार जोरात सुरू झाला असताना ते पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपला याचा किती फटका बसणार हे निवडणूक निकालावेळी दिसणार आहे. त्यांचा राजीनामा हा भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

तुषार कामठे यांनी 24 फेब्रुवारीला 2022 ला नगरसेवक पदाचा राजीनामा (Resignation from the post of corporator) दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये काम करत होते. योग्य संधीची वाट पहात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) हे अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारसाठी मतदार संघात येणार आहेत. त्यामुळे कामठे यांचा राजीनामा भाजप मंजूर करणार का? त्यांनी राजीनामा का दिला याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, त्यांच्या कामाची पक्षात दखल घेतली जात नव्हती आणि त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

तुषार कामठे हे अगोदर राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. चिंचवड मतदार संघातील पिंपळे निलखमधून ते 2017 ला निवडून आले होते. तेव्हापासून ते महानगरपालिकेतील विविध भ्रष्टाचार बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, त्यांच्या या कामाची पक्षाने दखल न घेतल्याने त्यांनी नगरसेवकपदाचा काही दिवसांचा कार्यकाळ शिल्लक असताना राजीनामा दिला होता. यानंतर आता चिंचवड निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार जोमात सुरु असताना त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. चिंचवडमध्ये भाजपने सभा, गाठीभेटी आणि कॉर्नर सभांचा धडाका लावला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे (Nana Kata of NCP) आणि अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत रंगणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. त्यांनी बुधवारी अश्विनी जगताप यांची भेट घेतली होती.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.