Type Here to Get Search Results !

पुणे पोलिसांनी ७६१ किलो गांजा, कोकेन, मेफेड्रोन, चरस, हेरॉईनची केली होळी

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील अंमली (Drugs) पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून जप्त केलेल्या 761 किलो अंमली पदार्थांची होळी करत पुणे पोलिसांनी हे पदार्थ नष्ट केले. त्यात गांजा (Marijuana), कोकेन (cocaine), मेफेड्रोन (mephedrone), चरस (Charas), हिरॉईन (heroin) अशा ड्रग्जचा समावेश होता. चार कोटी 10 लाख रूपये किमतीच्या अंमली पदार्थांची रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या (MEPL Company) भट्टीत (furnace) विल्हेवाट लावण्यात आली. (pune crime)

या अंमली पदार्थांचा पुनर्वापर होऊ नये, यासाठी तो रांजणगाव (Ranjangaon) येथील कंपनीच्या भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (Maharashtra Pollution Control Corporation), राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) आणि रासायनिक प्रयोगशाळेतील अधिकारी (Chemical Laboratory Officers) या वेळी उपस्थित होते.

शहरातील 16 पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची कारवाई केली होती. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकांनी 2022 या वर्षभरात 761 किलो 575 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले होते. बाजारभावानुसार (Market Rate) या अंमली पदार्थांची किंमत चार कोटी 10 लाख 6 हजार रूपये इतकी होती. अंमली पदार्थ विरोधी पथकांनी जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये सर्वाधिक गांजाचा समावेश होता.

तस्करांकडून तेलंगाना (telangana), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (karnatak) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांमधून पुणे शहरात गांजाची तस्करी केली जाते. पुणे, मुंबईसह इतर शहरांमध्ये तस्करांची टोळी कार्यरत असून, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यापुढेही तस्करांविरुध्द कारवाई सुरूच राहील, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.