Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news,
पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील मुंढवा (Mundhawa) येथील गुगलचे कार्यालय (Google Office in pune) बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा निनावी फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने (Bomb Detection and Disposal Squad (BDDS))गुगलचे कार्यालय आणि परिसरात कसून तपासणी (Inspection) केली. परंतु पथकातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळून आले नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांनी निनावी फोन करणार्या व्यक्तीस हैदराबाद येथून अटक केली आहे. (pune crime news)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 12 फेब्रुवारी 2023) रात्री मुंबईतील गुगलच्या कार्यालयात एकाचा निनावी फोन आला. त्या व्यक्तीने पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावर गुगलच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. पुण्यातील मुंढवा परिसरात एका कमर्शियल बिझनेस सेंटरच्या (Commertial Business Centre) इमारतीमध्ये 11 व्या मजल्यावर गुगलचे कार्यालय आहे.
मुंबई पोलिसांनी ही बाब पुणे पोलिसांना कळविली. त्यानंतर तातडीने मुंढवा पोलीस (mundhawa police) आणि बॉम्बशोधक व नाशक पथक गुगलच्या कार्यालयात पोचले. त्यांनी संपूर्ण कार्यालय आणि इमारतीच्या परिसरात तपासणी केली. मात्र, काहीही तथ्य आढळून आले नाही. मुंबई पोलिसांनी फोन करणार्याचा शोध घेतला असता, तो हैदराबाद (Hydrabad) येथून आल्याचे निष्पन्न झाले.
हैदराबाद पोलिसांच्या मदतीने निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. तो पुण्यातील गुगल कार्यालयात काम करणार्या एका कर्मचार्याचाच भाऊ आहे. रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याने हा फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84