Type Here to Get Search Results !

उत्तमनगर मधील तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून कर्वेनगर मध्ये लुटले; तिघे गजाआड

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मध्यरात्री घरी जात असलेल्या तरुणाला कर्वेनगरमधील (karvenagar) बोळात अडवून डोक्यात बिअरची बाटली घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार 30 जानेवारी 2023 रोजी पहाटे घडला.

याबाबत तुषार ज्ञानदेव धनवटे (वय 23, रा. इंगळे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी सौरभ पवार, राहुल चव्हाण आणि कुमार चव्हाण (रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) या तिघांना अटक केली आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील मावळे आळीत (mavle aali) घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अमित असे दोघे त्यांच्या मावशीच्या घरी जात होते. त्यावेळी बोळात सौरभ पवार याने त्यांना अडविले. खिशातील 960 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी यांनी विरोध केल्यावर राहुल चव्हाण याने त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. त्यांनी फिर्यादी व मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.