Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 23 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): विवाहितेला चुलीतील पेटलेले लाकुड घेऊन चटके दिले. हातपाय बांधून मिरची पावडरची पेस्ट तयार करुन ते पाणी विवाहितेच्या तोंडात, काना, डोळ्यात टाकले. अशा प्रकारचा माहेरहून हुंड्याचे पैसे घेऊन येण्यासाठी विवाहितेचा केला जात असलेला क्रूर छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
हा प्रकार केळेवाडीतील गिरीजा सोसायटी (Girija Society Kelewadi) व फिर्यादीच्या राहत्या घरी सुतारदरा (Sutardara) येथे ऑक्टोबर 2021 पासून 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत घडला आहे. याप्रकरणी एका 22 वर्षाच्या विवाहितेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 60/23) दिली आहे.
त्यावरुन नागेश कार्तिक साहेबन्ने (Nagesh Karthik Sahebanne) (वय 23), रत्ना कार्तिक साहेबन्ने (Ratna Karthik Sahebanne) (वय 42), महादेवी जाधव (Mahadevi Jadhav) (वय 58) आणि लिंबराज भिसे (Limbaraj Bhise) (वय 58, रा. केळेवाडी) यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार व हुंडा बंदी कायद्याखाली (Domestic Violence and Dowry Prohibition Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि नागेश साहेबन्ने यांचा ऑक्टोबर 2021 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर माहेरहून हुंड्याचे पैसे घेऊन ये, या कारणावरुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करुन छळ केला जात होता. चुलीतील पेटलेले लाकुड घेऊन फिर्यादीच्या हातावर, पायावर, डोळ्याजवळ, ओठावर अनेकदा चटके दिले. फिर्यादीचे हातपाय बांधुन मिरची पावडरमध्ये पाणी मिसळून याची पेस्ट बनवून ती फिर्यादीच्या तोंडात, कानात, डोळ्यात टाकली. त्यात फिर्यादी यांना जबर दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे (Sub-Inspector Kokate) तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84