Type Here to Get Search Results !

ब्रांडेड मालाच्या “फर्स्ट कॉपी” विकणाऱ्या दुकानावर रेड; “कॉपीराईट अ‍ॅक्ट" खाली गुन्हा दाखल

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): हडपसर येथील सय्यदनगर (Sayyadnagar, Hadapsar) भागात एका नामांकित कंपनीच्या नावाने बनावट शूज (Fake Shoes), चप्पलची विक्री सुरू असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला. (pune crime news)

 

याबाबत संबंधित कंपनीचे अधिकारी महेंद्र सिंग देवरा (रा. पाली, राजस्थान) यांनी तक्रार दिली आहे. आर्यन सेंटर (Aryan Centre) येथील एका दुकानावर छापा टाकून (police raid) पोलिसांच्या पथकाने सुमारे 1,12,000 रुपयांचे बनावट 75 नग जप्त केले गेले.

 

सय्यदनगर येथील दुकानात बनावट उत्पादने विकली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, युनिट पाचचे निरीक्षक उल्हास कदम (Unit 5 Inspector Ulhas Kadam) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कृष्णा बाबर (Assistant Inspector Krishna Babar), अंमलदार रमेश साबळे (Ramesh Sabale) यांच्यासह पथकाने दुकानावर छापा टाकला. या वेळी येथून सुमारे एक लाख 12 हजार 425 रुपये किमतीचे 75 नग जप्त केले आहेत.

 

या प्रकरणी विक्रेते समाधान पांडुरंग कोळी (Samadhan Pandurang Koli) (वय - 39, रा. सय्यदनगर, हडपसर) याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात कॉपीराइट अ‍ॅक्ट (Copyright Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Crime Branch Ram Nath Pokle) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यापूर्वी शहरात विविध ठिकाणी नामांकित कंपनीच्या नावे बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.