Type Here to Get Search Results !

10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिल्याने व्यक्तीचा मृत्यू; मित्रांमधली पैज पडली महागात

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये (Agra, Uttarpradesh) एका व्यक्तीला दारूची (wine) पैज लावणं जीवावर बेतलं आहे. मित्रांनी पैज लावल्यांनंतर अवघ्या 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (crime news)

याप्रकरणी पोलिसांनी मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. जय सिंह (Jay Singh) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताजगंज पोलीस ठाण्याच्या (Tajganj Police Station) हद्दीतील शिल्पग्राममधील (Shilpagram) जय सिंह आणि त्याचे मित्र भोला आणि केशव यांच्यामध्ये 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू प्यायची पैज (bet) लागली. यावेळी जय सिंहने 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिऊन पैज जिंकली, मात्र इतक्या फास्टमध्ये दारू पिल्यामुळे त्याची तब्येत इतकी बिघडली की तो बेशुद्ध झाला.

यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जय सिंहचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जय सिंहच्या नातेवाईकांनी भोला आणि केशवविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जय सिंहच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे असलेले 60 हजार रुपये सुद्धा गायब झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. या संपूर्ण प्रकरणी सदर आरोपींवर नियमानुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती शहराचे पोलीस उपायुक्त विकास कुमार (City Deputy Commissioner of Police Vikas Kumar) यांनी दिली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.