Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात शुल्लक कारणावरून ग्राहक आणि केळी विक्रेत्यामध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील गोखलेनगर (Gokhalenagar) परिसरात ही घटना शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी 2023) दुपारी घडली आहे. (Banana seller beaten for not reducing price)
केळीचे भाव कमी केले नाही म्हणून थेट टोळक्याने विक्रेत्याच्या नाकाचे हाड तोडले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेबाबत केशव आंद्रे (Keshav Andre) (21) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी 5 ते 6 अज्ञात तरुणांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंद्रे हे मूळचे मुंबईतील घाटकोपर चे आहेत. ते पुण्यात गोखलेनगर या भागात केळी विक्रेता म्हणून व्यवसाय करतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी 5 ते 6 तरुण फिर्यादी यांच्या केळीच्या हातगाडीवर गेले आणि केळी मागितली. भाव कमी करण्याची मागणी केली असता विक्रेत्याने नकार देताच (seller refuse to decrease price) या गोष्टीचा राग मनात धरून या टोळक्याने त्यांना हाताने आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत या तरुणांनी केळी विक्रेत्याच्या नाकावर मारले असता त्यांच्या नाकाचे हाड मोडले आणि त्यात ते जखमी झाले.
या प्रकरणी अज्ञात तरुणांवर भारतीय दंडात्मक कलम 143, 147, 325, 148, 149 अन्वये चतुशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84