Type Here to Get Search Results !

मोक्का मधील आरोपीचे पलायन; ते पोलीस अधिकारी, कर्मचारी निलंबित

 

पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मोकाच्या (MCOCA) गुन्ह्यातील आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत एका सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner of Police Sandeep Karnik) यांनी ही कारवाई केली. (pune crime news)

सहायक पोलीस निरीक्षक रामदास झुंबर मुंढे (Assistant Police Inspector Ramdas Zhumbar Mundhe) आणि पोलीस नाईक महेश राजेंद्र जाधव (Police Naik Mahesh Rajendra Jadhav) अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड (marketyard) येथील आंगडियाच्या कार्यालयात अविनाश गुप्ता (avinash gupta) याच्या टोळीने गोळीबार करीत 28 लाख रुपये लुटून (robbed) नेले होते. याप्रकरणी पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांनी या टोळीतील आरोपींवर मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई केली होती.

 

पोलीस कर्मचारी मुंढे आणि जाधव यांनी कोणतीही परवानगी न घेता आरोपी संतोष पवार (Santosh pawar) आणि साई कुंभार (sai kumbhar) यांना पोलीस लॉकअपमधून (police lockup) बाहेर काढले. ते त्यांना घरझडतीसाठी खानापूर (khanapur) येथे घेऊन गेले होते. त्यावेळी संतोष पवार हा पसार झाला होता.

 

पोलीस कर्तव्यात बेजबाबदार (Irresponsible) गैरवर्तन कारणीभूत ठरल्यामुळे सह आयुक्त कर्णिक यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित (Suspended) केले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.