Type Here to Get Search Results !

अग्निशमन यंत्रणा लावली नसल्याने पुण्यातील या रुग्णालयावर गुन्हा दाखल; लागली होती आग

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आगीसह फायर ऑडिटकडे (Fire Audit) होणारे अक्षम्य दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आग लागू नये म्हणून, आणि आग लागल्यानंतर आवश्यक अग्निशमक यंत्रणा व साधने लावलेली नसल्याने कुंदननगर (kundannagar), कासारवाडी (kasarwadi) येथील मॅक्स न्युरो रुग्णालयासह (max neuro hospital) कोटेश्वर टिंबर्स (koteshwar timbers), शुभम इंडस्ट्रीज (shubham industries), जय गणेश टायर्स (jai ganesh tyres), अरिहंत इंजिनिअरींग (arhint engineering) यांच्या मालकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने (pimpri chinchwad mahanagar palika) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फौजदारी गुन्हा नोंदविला आहे. (pune crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, कुंदननगर येथील जय गणेश टायर्सच्या गोदामाला 31 जानेवारी 2023 ला  पहाटे 2 च्या सुमारास आग लागली होती. शेजारच्या मॅक्स न्युरो रुग्णालयाकडील बाजू, शुभम इंडस्ट्रिज या ठिकाणी आग पसरली होती. त्यामुळे आजूबाजूच्या हाउसिंग सोसायट्यांनाही धोका निर्माण झाला होता.

सुरक्षेच्या दृष्टीने मॅक्स न्युरो रूग्णालयातील 19 रुग्णांना पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय (Dr. D. Y. Patil Hospital), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (Yashwantrao Chavan Memorial Hospital), थेरगावचे बिर्ला रुग्णालय (Birla Hospital, Thergaon) व इतर रुग्णालयात हलविण्यात आले. पिंपरी-चिंचवड व पुणे पालिका (PCMC and pune mahanagar palika), खडकी कॅन्टोन्मेंट (Khadki Cantonment), पीएमआरडीए (PMRDA) व टाटा मोटर्सच्या अग्निमामक दलाच्या (Tata Motors Fire Brigade) तब्बल 14 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

त्यासाठी अग्निशमन पथकास 5 तास झुंजावे लागले. त्या ठिकाणी विनापरवाना रबरी टायरचा साठा करण्यात आला होता. आगीमुळे परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते. जय गणेश टायर्सच्या गोदामामध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकाराचे अग्निशामक उपकरणे व साधने नव्हती. तसेच, अग्निशमन विभागाचे ना हरकत दाखला (No Objection Certificate – NOC) नव्हता. मॅक्स न्युरो रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा अपूर्ण प्रमाणात लावण्यात आली होती. त्याबाबत त्यांना पालिकेने फायर ऑडिटद्वारे कळविले होते. मात्र, त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने रुग्ण तसेच, परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगीबाबत कोणत्याही प्रकाराच्या प्रतिबंधक उपाययोजना केल्याचे किंवा काळजी न घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेच्या अग्निशामक विभागाने मॅक्स न्युरोसह वरील आस्थापनांवर भारतीय दंड संहिता 1860 अधिनियमान्वये कलम 436, 336, 285, 268, 290, 188, 34 अन्वये भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम (Maharashtra Fire Prevention and Life Protection Measures Act), 2006 हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. अधिनियमातील कलम 3(1) प्रमाणे कोणत्याही निवासी (हाउसिंग सोसायटी), वाणिज्य, मिश्र, व्यवसासिक मिळकती किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणार्या आग प्रतिबंधक उपयायोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची आहे.

इमारत (Building), कंपन्या (Companies), आस्थापनेत आगीसंदर्भातील स्वत:ची यंत्रणा (Self-contained fire fighting system) हवी. त्यामुळे हाउसिंग सोसायटी, कंपन्या, रुग्णालय, व्यावसायिक व विविध आस्थापना आदींनी आगीसंदर्भात सुरक्षा साधने व उपकरणे लावावीत. त्यांची नियमितपणे तपासणी करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.