Type Here to Get Search Results !

बाणेर मध्ये पुन्हा मेफेड्रॉन; अंमली पदार्थी विरोधी पथकाकडून 8 लाखांच्या मुद्देमालासह आसिफअली गजाआड

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पोलिसांनी एका व्यक्तीच्या ताब्यातून चार लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन (mafedrone) अंमली पदार्थ, कार आणि मोबाईल असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त (drugs confiscated) केला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (chaturshrungi police station) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. (pune crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर (Baner) परिसरात एकजण कारमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला.

बाणेर येथील योगी पार्क सोसायटीजवळ (Yogi Park Society) कारमध्ये एक संशयित व्यक्ती दिसून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, अंगझडतीमध्ये चार लाख रुपये किमतीचे 20 ग्रॅम मेफेड्रॉन, तीन मोबाईल आणि रोकड आढळून आली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर येथे ही कारवाई केली. आसिफअली अलीमुद्दीन शेख (Asif Ali Aleemuddin Shaikh) (वय 36, रा. हलावपूल, कुर्ला पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (Sub-Inspector of Police Digambar Chavan) करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.