Type Here to Get Search Results !

डॉक्‍टर चक्क तुम्ही सुद्धा करताय सावकारी वसुली; भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल



पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): व्यावसायिकाला व्यवसाय उभारण्यासाठी व्याजाने दिलेल्या रकमेची परतफेड झाल्यानंतरही 18 लाख रुपये उकळून आणखी पैशांसाठी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार एका डॉक्‍टरने केल्याचे उघड झाले. या प्रकरणी कृष्णा शंकर दोडमणी (krushna shanker dodmani)(वय 46, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली. (pune crime news)

दरम्यान, संबंधित डॉक्‍टराविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खासगी सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विनोद गोपीचंद मेहेर (Dr. Vinod Gopichand Meher) (रा. आळेफाटा, जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दोडमणी यांना व्यवसायासाठी 50 लाख रुपयांची गरज होती. त्यांनी त्यासाठी त्यांच्या ओळखीचे डॉ. विनोद मेहेर याच्याकडे पैशांची मागणी केली. डॉ. मेहेर याने दोडमणी यांना 4 टक्के व्याजाने 50 लाख रुपये दिले (Loan) होते. 50 लाख रुपये देतानाच त्याने त्यातील दोन लाख रुपये आगाऊ काढून घेतले होते. तसेच 50 लाख मुद्दल रकमेवर 18 लाख रुपये व्याज दोडमणी यांच्याकडून वसूल केले. त्यानंतरही त्याच्याकडून व्याजाच्या आणखी रकमेची मागणी केली जात होती. पैसे न दिल्यास दोडमणी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी त्याने (Threat to kill family) दिली होती. या प्रकाराला कंटाळून अखेर त्यांनी डॉ. मेहेरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.