Type Here to Get Search Results !

दिवसा टँकरचालक, रात्री वाहन चोर; दरोडा पथकाच्या कारवाईत 9 दुचाकी, मोबाइल जप्त

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शहर परिसरातून दुचाकी आणि मोबाइल चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आणि आरोपीकडून चोरीचे तीन मोबाइल संच जप्त केल्या असून, 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. (pune crime news)

सत्यम नामदेव काळे (Satyam Namdev Kale) (वय 21, सध्या रा. मुंढवा, मूळ रा. जालना), स्वागत आप्पा मांढरे (Swagat Appa Mandhare) ( वय 19, सध्या रा. मुंढवा, मूळ. रा. बारामती) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरटे दिवसा मोटार, टँकरवर चालक म्हणून काम करत असून, रात्री शहरातील वेगवेगळ्या भागातून 9 दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. काळे मोटारीतून प्रवासी वाहतूक करतो. मांढरे हा टँकरवर चालक म्हणून काम करत होता. दोघे पुण्यात कामानिमित्त वास्तव्यास आले आहेत. शहरातील वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाचे (The Anti-Robbery and Theft Squad of the Crime Branch) कर्मचारी गस्त घालत होते. (pune crime news)

पोलीस कर्मचारी विक्रांत सासवडकर (Police Constable Vikrant Saswadkar) आणि राहुल इंगळे (Rahul Ingle) यांना सूत्रांकडून माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडले. चौकशीत दोघांनी हडपसर (hadapsar), चंदननगर (chandan nagar), लोणीकंद (loni kand), मुंढवा (mundhawa), बंडगार्डनसह (band garden) शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि मोबाइल चोरी केल्याचे उघडकीस आले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police, Crime Branch, Ram Nath Pokle), उपायुक्त अमोल झेंडे (Deputy Commissioner Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर (Senior Police Inspector Sunil Pandharkar), सहायक निरीक्षक विवेक पाडवी (Assistant Inspector Vivek Padvi), उपनिरीक्षक गुंगा जगताप (Sub Inspector Gunga Jagtap), अशोक आटोळे, विनायक रामाणे, शिवाजी जाधव, संदीप येळे, दत्तात्रय खरपुडे, अमोल सरतापे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.