Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्याला (Sinhagad Road) लागून असलेल्या नांदेड फाट्याजवळील (Nanded Phata) पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनी लगत बाभळीच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आज आढळून आला. माहिती मिळाल्यावर हवेली पोलीस ठाण्याचे (haveli police station) पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar), पोलीस हवालदार अशोक तारु (Ashok Taru) व इतर कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. (pune crime news)
आत्महत्या (suicide) करणाऱ्या व्यक्तीचे नाव बंडू लक्ष्मण ढवळे (Bandu Lakshman Dhavale) (वय 43, रा. वाल्हेकर वस्ती, जिल्हा परिषद शाळेजवळ नांदेडगाव ता. हवेली जि. पुणे.) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास 19 वर्षांची मुलगी घरात एकटी असताना बाप बंडू ढवळे हा दारुच्या नशेत घरी आला. "तुला पोलीस भरती करायचेय, काय येईल तेवढा खर्च मी करणार आहे, मला तू खुप आवडतेस," असं म्हणत नराधम बापाने मुलीसोबत अश्लील वर्तन सुरू केले.
घाबरलेली मुलगी घराबाहेर पळाली व तिने कामाला गेलेल्या आईला रडतरडत घडलेला प्रसंग सांगितला. मुलीची आई कामावरुन घरी आली व मुलीला घेऊन थेट हवेली पोलीस ठाण्यात गेली. मुलीच्या तक्रारीवरून नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल (FIR) करुन माय-लेकी आपल्या मुळ गावी निघून गेल्या.
तेव्हापासून हवेली पोलीस आरोपी वासनांध बापाचा शोध घेत होते. आज सकाळी नांदेड फाट्याजवळ एका बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील बंडू ढवळे याचा मृतदेह आढळून आल्यानंतर यामागील धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे.
पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय पाटसकर (Ajay Pasatkar) व पोलीस हवालदार अशोक तारु याबाबत अधिक तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84