Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): लॅक्टोज विक्री परवान्यासाठी (lactose seller permit) दहा हजार रुपयांची लाच (bribe) मागितल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागातील (Food and Drug Authority) सहायक आयुक्तांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहायक आयुक्त साहेब एकनाथराव देसाई (Assistant Commissioner Saheb Eknathrao Desai) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. (pune crime news)
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनी मार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी साहेब देसाई यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता देसाई यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. देसाई यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe) तपास करीत आहेत.
शिक्षण विभागातील अधिकारी लाचप्रकरणी अटकेत
सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार (6th and 7th pay commission) वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याप्रकरणी एका शिक्षकाने तक्रार दिली होती. (pune crime news)
वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला गिरी (Senior Accounts Officer Pramila Giri) (वय 38) आणि कनिष्ठ लेखाधिकारी अनिल लोंढे (Junior Accounts Officer Anil Londhe) (वय 57) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार (Deputy Superintendent of Police Vijayamala Pawar) तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84