Type Here to Get Search Results !

फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्याची आत्महत्या; या कारणामुळे दिला जीव

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राहत्या घरी एका नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील (sinhagad road) किरकटवाडी (kirkitwadi) येथील भैरवनाथनगर (bhairavnath nagar) येथे घडली. (pune crime news)

उत्तम सखाराम धिंडले (Uttam Sakharam Dhindle) (वय- 27, भैरवनाथनगर, किरकटवाडी, ता. हवेली, मुळ रा. घिसर, ता. वेल्हे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी फायनान्स कंपनीत (Private Finance Company) रिकव्हरीचे (Recovery) काम करणाऱ्या उत्तमचा नुकताच विवाह (newly married) झालेला होता व काही महिन्यांपूर्वी तो पत्नीसह किरकटवाडी येथे राहण्यास आला होता. कामावर जाताना व येताना तो नेहमी बोलायचा परंतु मागील दोन दिवसांपासून तो शांत दिसत होता असे आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितले.

आज सकाळी तो पत्नीला कामावर सोडून पुन्हा घरी आला होता. सायंकाळी पत्नी कामावरुन आल्यानंतर तिने घराचे दार वाजवले परंतु आतुन कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. आजुबाजुच्या रहिवाशांनी घराचा दरवाजा तोडला असता उत्तमने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

तातडीने याबाबत हवेली पोलीस ठाण्याला (Haveli Police Station) कळविण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष भापकर (Police Naik Santosh Bhapkar) व पोलीस कॉन्स्टेबल महेश कांबळे (Police Constable Mahesh Kamble) हे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे तपास करून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम (Assistant Police Inspector Nitin Nam), पोलीस नाईक संतोष भापकर (Police Naik Santosh Bhapkar) यांनी संबंधित फायनान्स कंपनीचा मॅनेजर अमन खुराना (Company Manager Aman Khurana) याला विमाननगर (Vimanagar) येथून अटक केली आहे.

आई, भाऊ, पत्नी या सर्वांची मी माफी मागतो. आता मी सर्वांना सोडून जात आहे. मला अमन खुराना यांनी खुप त्रास दिला. वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शिवीगाळ करायचे. अमन खुराना यांच्या त्रासामुळे काही कस्टमरचे पैसे मी स्वतः भरले परंतु कस्टमरने मला पैसे दिले नाहीत. अमन खुराना यांनी मला सहन करण्याच्या पलीकडे त्रास दिला. माझ्या मृत्यूला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत. माझे दोघंही भाऊ देवासारखे आहेत. आईची काळजी घ्या. मी गेल्याचे आई आणि पत्नीला लवकर सांगू नका.” असा धक्कादायक मजकूर उत्तमने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवला आहे.

मॅनेजरच्या जाचामुळे उत्तमचा जीव गेला, किमान इतरांना असा त्रास होऊ नये म्हणून अमन खुराना याच्यावर कडक वाई करावी अशी मागणी उत्तमचे कुटुंबीय व नातेवाईकांनी केली आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar) याबाबत अधिक तपास करत आहेत. 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.