Type Here to Get Search Results !

वडारवाडी भागात अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आपल्यासोबतच प्रेमसंबंध ठेवण्यासाठी अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अ‍ॅसिड (acid attack) फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना वडारवाडी (wadarwadi) परिसरात घडली आहे. (pune crime news)

याप्रकरणी एका महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshrungi police station) फिर्याद दिली असून या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय राजू चव्हाण (वय 24, रा. वडारवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिल्यावर त्याने 'तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकतो', असे म्हणत तिच्या अंगावर बाटलीतील अ‍ॅसिडसदृश्य द्रव फेकले. त्यावेळी मुलीने स्वतःचा बचाव केला.

परंतु या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अक्षय चव्हाण याला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने तिला घाबरविण्यासाठी हा प्रकार केला. प्रत्यक्षात ते अ‍ॅसिड नसून टॉयलेट क्लिनर असल्याचे सांगितले. चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.