Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): हडपसर (Hadapsar) परिसरातील दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी टोळीप्रमुख पंकज वाघमारे याच्यासह पाचजणांविरुध्द संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांनी याबाबतचे आदेश दिले होते.
याप्रकरणी पाचजणांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे (Pankaj / Pankya Gorakh Waghmare) (वय 24, रा. गाडीतळ, हडपसर), स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (Swapnil / Bitya Sanjay Kuchekar) (वय 22, रा. मांजरी, ता. हवेली), राहुलसिंग रवींद्रसिंग भोंड (Rahul Singh Rabindra Singh Bhond) (वय 18, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), आकाश ऊर्फ आक्या गोविंद शेंडगे (Akash / Akya Govind Shendge) (वय 20, रा. मांजरी बुद्रूक) आणि एका अल्पवयीन मुलाचा (Minor) समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोळीप्रमुख पंकज वाघमारे आणि त्याचे इतर चार साथीदार हे 25 डिसेंबर रोजी फिर्यादीच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून ‘आवाज मत करो, नहीं तो जान से मार दूँगा. तुम्हारे पास जो कुछ हैं, वो चुपचाप निकाल के दे दो’ असे बोलून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करुन घेऊन गेले. याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पाचजणांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
आरोपींच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत करणे, प्राणघातक हत्यारे बाळगणे, नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात हडपसर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन शर्मा (Additional Commissioner of Police Ranjan Sharma) यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करून प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (Assistant Commissioner of Police Bajrang Desai) करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84