Type Here to Get Search Results !

कसबा पोटनिवडणूक बंदोबस्त; गुन्हे शाखेने पिस्तूलासह एका तरुणाला पकडले

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, katraj news)

 

पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील (kasaba by-election) बंदोबस्तात गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तूल (pistol) बाळगणाऱ्या एकाला पकडले. दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याचे आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले. (pune kasba election)

आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. अभिषेक दीपक हजारे (वय 21, रा. शिवसेना शाखेजवळ, जनता वसाहत, पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. घोरपडे पेठेत (Ghorpade peth) ही कारवाई करण्यात आली.

कसबा विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक घोरपडे पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी एक जण एकबोटे काॅलनी परिसरात थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून हजारेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल आढळून आले. पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (Deputy Commissioner of Police Amol Zende), सहायक आयुक्त सुनील पवार (Assistant Commissioner Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Police Inspector Sandeep Bhosale of Unit 1, Crime Branch), सहायक निरीक्षक आशिष कवठेकर (Assistant Inspector Ashish Kawthekar), रमेश तापकीर (Ramesh Tapkir), दत्ता सोनवणे (Datta Sonawane), अनिकेत बाबर (Aniket Babar), राहुल मखरे (Rahul Makhare), शशिकांत दरेकर (Shashikant Darekar), तुषार माळवदकर (Tushar Malwadkar) आदींनी ही कारवाई केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.