पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सराईत गुन्हेगार संतोष बाळू पवार (वय 23, रा. खानापूर) याने हातातील बेडीने पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून साथीदारासह दुचाकीवरून फरार झाला. त्याने केलेल्या हल्ल्यात मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे (market yard police station) सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे (ramdas mundhe) हे जखमी (injured) झाले.
ही घटना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी 2023) सायंकाळी 6:30 सुमारास खानापूर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ (zilha parishad school) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या (market yard police station) हद्दीत घडलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मोक्काअंतर्गत (MCOCA) कारवाई करण्यात आलेला संतोष पवार (Santosh pawar) व साई कुंभार (sai kumbhar) यांना पोलिसांनी खानापूर येथे आणले होते. मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुंढे व दोन कर्मचारी त्यांना घेऊन आले होते. दोन्ही आरोपींच्या हातात बेड्या होत्या.
पवार याला घरात आणताच तो पोलिसांच्या तावडीतून बाजूला झाला. हातात बेड्या ठोकल्या असतानाही तो पोलिसांच्या अंगावर धावून गेला. आरडाओरडा करत त्याने बेडीने पोलिसांवर हल्ला केला. कुंभार याला एका पोलीस कर्मचाऱ्यांने बेडीसह धरून ठेवले होते. त्यामुळे त्याला हालचाल करता आली नाही. आरोपींशी झालेल्या झटापटीत मुंढे खाली पडले. त्याचा फायदा घेत पवारने त्यांच्यावर हल्ला केला. पवारने बेडीने मुंढे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बेडीने केलेल्या जोरदार प्रहारामुळे मुंढे जखमी झाले. त्यानंतर साथीदारासह तो दुचाकीवरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, हवेलीचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, हवेली गुन्हे शोध पथकाचे हवालदार विलास प्रधान, नीलेश राणे, नाईक राजेंद्र मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी सिंहगड – खानापूरचा परिसर रात्रभर पिंजून काढला. मात्र, आरोपी सापडले नाहीत.
आरोपी पवार व त्याच्या इतर साथीदारांवर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वीही पवार व त्याच्या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. तपास हवेली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम करीत आहेत.
आरोपींना तपासासाठी घरी आणले जाणार असल्याची माहिती त्यांच्या साथीदारांना कशी मिळाली, तसेच मोक्का व इतर गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना तपासासाठी त्याच्या घरी नेण्यासाठी केवळ तीनच पोलीस कर्मचारी पाठविण्यात आले. स्थानिक पोलिसांची मदत घेतली का, याचा तपास वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84