Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील काही भागात वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या (Koregaon park) भागात सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. (pune crime news)
पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर आहे. या भागात आशियाना पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत (Asiana Park Co-operative Housing Society) स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. या सोसायटीतील फेमिना स्पा (Femina Spa) मध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Cell) पोलिसांनी छापा (Raid) टाकला. त्यांना तीन महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. पोलिसांनी त्या तिघं महिलांची सुटका केली. 24, 28 आणि 43 वर्षीय त्या महिला होत्या.
या ठिकाणावरुन दोघांना अटक करण्यात आली आहे. नजमूल सुतवली हुसेन (Najmul Sutwali Hussain) (वय 19) आणि रिपुल आलम (Repul Alam) (वय 19) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी फेमिना स्पामध्ये छापा टाकला असताना जागा मालक आढळला आहे. पोलीस (police) त्याचा शोध घेत आहे. तसेच जागा मालक आणि स्पाचालक एकच आहे का? याचीही शोध घेतला जात आहे.
पाश्चात्य देशांमधील स्पा सेंटरचा फंडा गेल्या काही वर्षांपासून भारतात आला आहे. भारतातील अनेक लहान, मोठ्या शहरांमध्ये स्पा सेंटरचे बोर्ड लावलेले दिसतात. या ठिकाणी मसाज केली जाते. स्वीडिश, डिप टिश्यू व ट्रिगर प्वाइंट असे वेगवेगळे अनेक पर्याय देऊन मसाज केली जाते. यामाध्यमातून काही ठिकाणी वेश्याव्यवसाय केला जातो.
शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांनी अशा सेंटर्सवर छापा टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही स्पा तर निवासी संकुलातही थाटण्यात आल्याचे प्रकार याआधी समोर आले होते. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84