Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कोथरूड (Kothrud) मध्ये रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरून नेलेप्रकरणी (Golden chain snatched and stolen) चोरट्याला बेड्या ठोकण्यात कोथरूड पोलिसांना (Kothrud Police Station) यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचे मंगळसूत्र आणि मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला असल्याची माहिती कोथरूड पोलिसांनी दिली. (pune crime news)
याबाबत रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास कोथरुड मधील गोल्ड इंपेरियल बिल्डिंग (Imperial Gold Kothrud), होलमार्ट येथील दुकानाच्या शेजारी, रोडवर महिला एकटी उभी असल्याचा फायदा घेवून, अॅक्टिव्हा गाडीवरून जॅकेट, मास्क, टोपी परिधान करून आलेल्या अनोळखी चोरटयाने, या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी करून पळून गेला होता. सदर घटनेबाबत कोथरुड पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने, परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा (Circle 3 Deputy Commissioner of Police Suhail Sharma), कोथरुड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे (Kothrud Division Assistant Commissioner of Police Rukmini Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior Police Inspector Hemant Patil of Kothrud Police Station), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बड़े (Police Inspector Balasaheb Bade of Crime Branch), पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी (Sub-Inspector of Police Basavaraj Mali), तपास पथकातील पोलीस अंमलदार विशाल चौगुले (Vishal Chowgule, a police officer in the investigation team), योगेश सुळ (Yogesh Sul), विष्णु राठोड (Vishnu Rathod), आकाश वाल्मिकी (Akash Valmiki), अजय शिर्के (Ajay Shirke), संजय दहिभाते (Sanjay Dahibhate), शरद राऊत (Sharad Raut), मंगेश शेळके (Mangesh Shelke) यांच्या पथकाने संबंधित संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
यामध्ये कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास पथकातील अधिकारी, अंमलदार पोलीस हवालदार विशाल चौगुले, पोलीस शिपाई आकाश वाल्मीकी आणि विष्णु राठोड यांनी गुन्हा घडलेपासुन, रात्रंदिवस घटना घडलेल्या परिसरापासून आवश्यक त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (CCTV camera) पाहणी करून, चोरटयाने वापरलेली पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा स्कूटर आणि तिच्या नंबर बाबत खात्री करून अनोळखी चोरट्याबाबत लोहगाव, विमाननगर, कोथरुड परिसरामध्ये माहिती घेऊन, संशयित इसम नामे सचिन नथु पोळ (Sachin Nathu Pol) (वय 39, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे) यांस गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
संशयित सचिन पोळ याच्याकडून 17 तोळे 250 मिलीग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, अॅक्टिव्हा स्कूटर आणि इतर असा एकूण 1, लाख 35 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याने अशाप्रकारे आणखीन काही गुन्हे केले आहेत का?, त्याला गुन्हे करण्यात कोण मदत करते का? याचा पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84