Type Here to Get Search Results !

७ लाखांचे १३ लाख ७० हजार वसूल केले, तरीही आणखीन १३ लाख ५० हजारांची मागणी; अखेर गुन्हा दाखल

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, katraj news)

 

पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): लक्ष्मी रस्त्यावरील (pune laxmi road) एका कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला धमकावून खंडणी (extortion) उकळणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. याबाबत 28 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. (extortion crime - pune news)


या प्रकरणी कांबळेचे साथीदार आकाश कासट (Akash Kasat), जमीर कदम (Jamir Kadam) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र पिरप्पा कांबळे (Ravindra Pirappa Kamble) (वय 36, रा. बुधवार पेठ) असे अटक (arrested) केलेल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय (clothing business) आहे. त्याने आरोपींकडून सात लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात व्यावसायिकाने आरोपींना एकूण 13 लाख 62 हजार रुपये परत केले होते. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे 13 लाख 50 हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.

व्यावसायिकाने याबाबत खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare) यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून कांबळे याला अटक केली असून त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ram Nath Pokle), उपायुक्त अमोल झेंडे (Deputy Commissioner Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare), सहायक निरीक्षक अभिजित पाटील (Assistant Inspector Abhijit Patil), मधुकर तुपसौंदर (Madhukar Tupsoundar), हेमा ढेबे (Hema Dhebe) आणि रवींद्र फुलपगारे (Ravindra Fulpagare) यांनी ही कारवाई केली.


काच विक्री व्यापाऱ्याकडेही मागितली खंडणी


काच विक्री व्यापाऱ्याकडे माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अविनाश दिलीप अडागळे (वय 32, रा. वारजे) असे अटक आरोपीचे नाव आहे. व्यापाऱ्याकडे आलेल्या टेम्पोतील काचा उतरविण्यासाठी अडागळेने खंडणीची मागणी केली होती. व्यापाऱ्याने तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने अडागळेला अटक केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.