Type Here to Get Search Results !

अपघात करून पळून जात असताना इराणी तरुणाची पोलिसांना मारहाण; पुण्यातील घटना

 

पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पोलिसांकडून कायद्याचे पालन केले जावे, अशी अपेक्षा नागरिकांनी करणे गैर नाही मात्र नागरिकांनी देखील कायदा हातात घेणे तितकेच चुकीचे आहे. अशीच एक घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात उघडकीला आलेली असून अपघात करून पळून जात असताना एका इराणी तरुणाने (Irani young man) चक्क पोलिसांना मारहाण (man beats up the police) केलेली आहे. सदर घटना शनिवारी (दि. 28 जानेवारी 2023) घडली. (pune crime news)

ही घटना औंध सांगवी रस्त्यावर (aundh sangvi road) घडलेली असून सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडलेला आहे. शहावली बोर आली अकबर रहमान (वय 26, रा. संत तुकाराम नगर पिंपरी, मूळ इराण) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर अपघात झाल्यानंतर तात्काळ वाहतूक पोलीस घटनास्थळी गेलेले होते. त्यावेळी आरोपी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने चालवत होता अन पुढे जाऊन त्याने एका दुचाकीला धडक दिली आणि तो खाली पडला.

 333333333333333333333333333333333

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने पोलिसांना मदत करणे सोडून मारहाण करणे सुरू केले. सहाय्यक फौजदार अनंत यादव (anant yadav), पोलीस कर्मचारी संतोष सपकाळ (Police Constable Santosh Sapkal) यांना त्यांनी धक्काबुक्की केली त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

 

पुणे शहरात विदेशातून शिक्षणासाठी अनेक तरुण-तरुणी येत असतात तसेच पर्यटकांचा देखील मोठा ओघ पुण्यात आहे. शहरात आल्यानंतर व्हिजाची मुदत संपल्यानंतर आपापल्या देशात जाणे बंधनकारक असताना अनेक नागरिक अशाच पद्धतीने शहरात वास्तव्य करून आहेत. त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्था यांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. व्हिजाची मुदत संपल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिसात सांगून आपापल्या देशात निघून जाण्याची गरज असताना त्यानंतरही अनेक नागरिक शहरात राहून कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे. अशा नागरिकांवर कठोर कारवाईची मागणी पुणेकर करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.