Type Here to Get Search Results !

अजबच आहे हे; नवऱ्यासोबत राहून प्रियकराशी संबंध, प्रियकरासोबत पळाल्यावर नवऱ्यासोबत संबंध

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात (pune news) एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका विवाहित प्रेयसीच्या पतीने ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर प्रियकर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 2 फेब्रुवारी 2023) उघडकीला आलेली आहे. (love triangle)

मंगेश सुरेश जाधव (वय 33 रा. मंतरवाडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सुसाईड नोटमध्ये (suicide note) त्याने आपण प्रेयसी आणि तिच्या पतीकडून मानसिक त्रास (Mental torture) दिला जात असल्याने आत्महत्या करत आहोत, असे म्हटलेले आहे. सुरेश मारुती जाधव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. लोणी काळभोर पोलिसांनी (loni kalbhor police) विवाहित प्रेयसी आणि तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल (FIR) केलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश हा एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड (security guard) म्हणून काम करत होता. तो विवाहित असून त्याचे पत्नीसोबत पटत नसल्याने तो एकटाच राहायचा याच दरम्यान परिसरातील एका विवाहित महिलेसोबत त्याचे प्रेम प्रकरण जुळलेले होते.

महिलेच्या पतीला याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला मूळ गावी वाशीम (washim) येथे पाठवून दिले त्यानंतर देखील ती मंगेश याला सतत फोन करत राहायची. तिच्या पतीने तिला त्यानंतर परभणी (parbhani) जिल्ह्यातील बाजारपुरी (bajarpuri) येथे आणले मात्र त्यानंतर ती गायब झाली. पोलिसांनी त्यानंतर तिला शोधून काढले त्यावेळी तिने आपण पतीसोबत राहणार नाही तर मंगेश याच्यासोबत राहणार आहोत असे लिहून दिलेले होते.

त्यानंतर मंगेश आणि त्याची प्रेयसी मंतरवाडी (Manterwadi) येथे राहायला आले. सदर महिला ही अद्यापदेखील आपल्या पतीसोबत बोलत आहे हे लक्षात आल्यानंतर मंगेश आणि तिच्यातही वाद सुरू झाले. त्यानंतर महिलेचा पहिला पती याने मंगेश याला जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर प्रेयसी देखील घरातून निघून गेली त्यानंतर मंगेश हा नैराश्यात (depression) गेलेला होता त्यातून त्याने हा प्रकार केला असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.