पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मयत तरुणाचे नाव अतुल तुपसौंदर्य (atul tupsaundarya) असे आहे. याबाबत कविता अतुल तुपसौंदर्य यांनी खडकी पोलिसांकडे (khadki police) फिर्याद दिली आहे. (pune crime news)
या प्रकरणी पुण्यातील दोन डॉक्टरांसह परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. खालीद सय्यद (Dr. khalid saiyyad), डॉ. आयेशा सय्यद (Dr. aayesha saiyyad) आणि परिचारिका सुनिता गडपल्लु (Sunita Gadpallu) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल यांना सप्टेंबर 2021 मध्ये अंगात कणकण वाटत होती. यासाठी ते 21 तारखेला खडकीतील जुना बाजार येथील डॉ. सय्यद यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉ. खालीद व डॉ. आयेशा यांनी अतुल यांच्या कमरेवर इंजेक्शन दिले. हे चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे अतुल यांना त्या जागी इन्फेक्शन (infection) झाले. या नंतर त्यांना ससून रुग्णालयात (sasun hospital) दाखल करण्यात आलं मात्र 3 दिवसात त्यांचा मृत्यू झाला.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अतुल यांचा मृत्यु झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आणि सव्वा वर्षानंतर या बाबत अहवाल आता समोर आला आहे. अहवालातून समोर आलेल्या निष्कर्षानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खडकी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84