Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे पोलीस आयुक्तपदाची रितेश कुमार (police commitioner ritesh kumar) यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरात गुंडागर्दी करणाऱ्या तसेच दहशत माजवणाऱ्या अनेकांवर कारवाईचा धडाकाच लगावला असून यात अनेकांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई काहीजणांना स्थानाबद्दल करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात कोयता गॅंगने (Koyta Gang) धुमाकूळ घातल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली. या कारवाईनंतर त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा (Tobacco) विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या दिशेने कारवाई चालू केली. (Pune Crime News)
कारवाईचा हा धडाका असा चालू असून आता त्यांनी अवैध धंद्यांकडे लक्ष केंद्रित केले असून मटका, सोरट, जुगार (Ritesh Kumar filing cases against Matka, sorat, gambling) यांच्यावर कारवाई होत असल्याची माहिती समोर येत आहे. याच अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस स्टेशन (Loni Kalbhor Police Station) अंतर्गत येणाऱ्या थेऊर (Theur) येथे अवैधरित्या चालू असलेल्या मटका व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell) धाड टाकली असून या कारवाईत एकूण 23 जणांवर कारवाई करण्यात आली, तर 68 हजार 700 रुपयांचा मध्यमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Pune News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत विकास रमेश पाटील (सोरट चालक) शाम सुरेश सावंत, नितीन बबन आटोळे, वसंत केशव चव्हाण, अजित रमेश सावंत (मटका रायटर) योगेश सुरेश महाजन, कैलास दौलत सावंत, (मटका चालक) यांच्यासह गणेश राजू सिंग, अमोल मोहन घाडगे, मल्हारी रेशीम जाधव, विकास रामदास आठवले, रियाज बाबुराव शेख, आकाश खुडे, शुभम सुनील भगत, प्रथमेश कैलास कड, शुभम भगत, राजेंद्र बालाजी घरकळ, वैभव रामदास सावंत, राजन दत्तात्रेय गावडे, गणेश सुदाम राखपसरे, राजेंद्र निवृत्ती सुरवसे, पांडुरंग निवृत्ती राखपसरे, साहेबराव निवृत्ती राखपसरे, आणि ज्ञानेश्वर निवृत्ती राखपसरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आलेल्या या अवैध धंद्यावरील कारवाईनंतर गावात एकच चर्चा सुरू झाली, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सुरू केलेल्या या कारवाईनंतर अनेक अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गुटखा विक्रीवर प्रतिबंध लावण्यासाठी कारवाईतील सातत्यता पाहिल्यानंतर आता अवैध धंद्यांकडे अशाच कारवाईच्या सातत्याची आवश्यकता असल्याची नागरिकाच्या चर्चा आहे.
ही कारवाई सामाजिक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्विनी पाटील (Assistant Police Inspector of Social Department Ashwini Patil), पोलीस हवालदार कुमावत (Police Constable Kumawat), राणे, पुकारे, पठाण, कांबळे, पोलीस शिपाई जमदाडे (Police constable Jamdade) आणि संदीप कोळगे (Sandeep Kolge) आणि थेऊर पोलीस चौकीचे (theur police station) पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख (Sub-Inspector of Police Vishnu Deshmukh), पोलीस नाईक विशाल बनकर (Police Naik Vishal Bunkar) यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार दिगंबर जगताप (Police Constable Digambar Jagtap) करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84