Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मधील गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई; आयुक्त रितेश कुमार यांचे १ डझन मोक्का पूर्ण

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर (Karvenagar) मध्ये कामावरून घरी जात असलेल्या एकाच्या डोक्यात बिअरची बाटली (Beer Bottle) मारून, त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत, त्याच्याकडील 960 रुपये लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांवर मोक्का (MCOCA) कारवाई करण्यात आली असून, पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune City Police Commissioner Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून केलेली ही बारावी कारवाई ठरली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळी प्रमुख सौरभ सुनिल पवार (Saurabh Sunil Pawar) (वय 19 वर्षे, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) आणि त्याचे इतर 2 साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन त्यांनी फिर्यादी हे त्यांचा मित्र अमित धनवे (Amit Dhanave) असे दोघे कामावरून घरी जात असताना, त्यांना जबरदस्तीने अडवून सौरभ पवार (Saurabh Pawar) याने फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशातील रोख रूपये 960 जबरदस्तीने काढून घेत असताना फिर्यादीने त्यास विरोध केला असता, दुसर्याने बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांनी फिर्यादी व त्यांचे मित्रास शिवीगाळ व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून पोलीसांत तक्रार केली तर जीवे ठार मारील अशी धमकी दिली होती. याबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान यातील आरोपी नामे (1) सौरभ सुनिल पवार, (वय - 19 वर्षे, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे (2) राहुल गणेश चव्हाण (वय-20 वर्षे, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) (3) कुमार हिरामण चव्हाण (वय-29 वर्षे रा. मावळे आळी, कर्वेनगर, पुणे) यांना अटक करण्यात आली होती. सदर आरोपी सौरभ सुनिल पवार याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन, स्वतःची संघटीत टोळी तयार करून गुन्हे केलेली असल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाले.

त्याचबरोबर त्यांनी अवैध मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे (Attemp To Kill), खंडणी मागणे (Extortion), जबरी चोरी (Theft), गंभीर दुखापत करणे (causing serious injury), नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करून तोडफोड करणे (Vandalism by damaging citizens' property), बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे (Illegal possession of a weapon), पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे (Violation of police order), सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे (Creating terror in the minds of citizens), बेकायदेशीर जमाव जमवणे (Unlawful assembly of mobs) यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केले असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवर नमूद झालेले आहे.

यातील आरोपींनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदयाकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने, प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (Maharashtra Control of Organized Crime Act - MCOCA) सन 1999 चे कलम 3 (1) (ii).3 (2).३(4) प्रमाणे अंर्तभाव करणेकामी वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior Police Inspector Dagdu Hake) यांनी परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा (Circle 3 Deputy Commissioner of Police Suhail Sharma) यांच्या मार्फत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Additional Commissioner of Police, Western Regional Division, Rajendra Dahale) यांना सादर केलेला होता. त्यानुसार सदर प्रकरणाची छाननी करून तीनही आरोपींवर दाखल असलेल्या गुन्हयात मोक्का नुसार कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (Joint Commissioner of Police Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेंद्र डहाळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ 3) सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त (कोथरूड विभाग) रुक्मिणी गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल आणि पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही 12 वी कारवाई आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.